Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिंदीत दिसणार अनुजाची ‘तमन्ना’

By admin | Updated: January 22, 2016 02:13 IST

हिंदीतून मराठीत आणि मराठीतून हिंदीत जाणाऱ्या कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे.

हिंदीतून मराठीत आणि मराठीतून हिंदीत जाणाऱ्या कलाकारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. कारण अमराठी लोकांना मराठी माणसातील गुणांबाबत, त्यांच्यातील कलेची दखल घ्यावीशी वाटू लागली आहे. त्यामुळे मराठी कलाकारांचा भाव सध्या भलताच वधारलाय, असं काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याचे कारण अर्थातच हिंदी कलाकारांच्या तोडीस तोड आपले मराठमोळे कलाकार आहेत. आता हेच पाहा ना, बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्साळींनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात मराठी कलाकारांची अक्षरश: फौज होती. त्यातीलच अजून एक मराठमोळी मुलगी म्हणजे अनुजा साठे-गोखले. या चित्रपटानंतर आता अनुजा लवकरच एका हिंदी मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी अनुजाने अग्निहोत्र, सुवासिनी, लगोरी, मांडला दोन घडीचा डाव या मालिकांमध्ये आणि राखणदार, कॉफी आणि बरंच काही, शिनमा या चित्रपटात अभिनय केला आहे. यानंतर आता अनुजा आता ‘तमन्ना’ या हिंदी मालिकेत झळकणार आहे. अभिनय देव मालिकेचे दिग्दर्शन करीत असून ही मालिका महिला क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे. क्रिकेटच्या मैदान गाजविण्याबरोबरीनेच घरसंसार सांभाळणारी अनुजा यामध्ये पाहायला मिळेल. १ फेब्रुवारीपासून ही मालिका सुरू होत आहे.