बॉलीवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती हॉट अभिनेत्री करिना कपूर-खानचीच. ती पंजाबी शिकत असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या पाठोपाठ समजले ते करिनाने शाहीद कपूरसोबत ‘उडता पंजाब’मध्ये काम करण्यास नकार दिला. आता त्या जागी शाहीदबरोबर आलिया भटची जोडी पडद्यावर दिसेल. आता कुजबुज आहे, ती करिनासाठी नवा जोडीदार मिळालेला आहे अभिनेता फवाद खान याची. त्यामुळे बॉलीवूडमध्ये सध्या ‘बेबो’च चर्चेचा विषय झाली आहे.