Join us

अरेच्चा..! 'तैमुर स्वतःला समजतो श्रीराम', सैफ अली खानने सांगितली त्याच्याबद्दल मजेशीर बाब

By तेजल गावडे | Updated: October 14, 2020 15:25 IST

तैमुरला रामायण पाहायला खूप आवडत असल्याचे सैफने सांगितले.

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच त्याच्याबद्दल जाणून घ्यायला बऱ्याच जणांना आवडते. सैफ अली खानने काही दिवसांपूर्वी तैमूरची मजेशीर बाब चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तैमुरला रामायण पाहायला खूप आवडत असल्याचे सैफने सांगितले. इतकेच नाही तर त्याने सांगितले की तैमूर स्वतःला श्रीराम समजतो.

सैफ अली खानने रेडिफला दिलेल्या मुलाखतीत तैमूरबद्दलच्या काही गोष्टी शेअर केला. त्यावेळी त्याने सांगितले की तैमूरला लॉकडाउनमध्ये टीव्हीवर आलेली रामायण ही पौराणिक मालिका खूप आवडली होती. ती मालिका आवडण्याचे एक खास कारण आहे. ही मालिका पाहिल्यावर तैमूरला तो श्रीराम असल्यासारखे वाटते आहे.

त्याला रामायण मालिका तर आवडतेच. तसेच त्याला किंग आर्थर आणि तलवारींबद्दल ऐकायलाही आवडते. 

सैफ अली खानने पुढे सांगितले की तो आणि करिना त्याला यासंबंधीच्या गोष्टीही वाचून दाखवत असतो. तैमूरला क्रिकेट किंवा फुटबॉल फारसं आवडत नाही. पण त्याला नाच, गाणं, चित्रकला आवडतं.

करिना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हलणार आहे. करिना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे. सैफ आणि करिनाच्या टीमकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. आम्हाला सांगण्यास आनंद होतो आहे की, एका नवा पाहुणा आमच्या कुटुंबात येणार आहे. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि प्रेमाबदल धन्यवाद अशा शब्दात सैफ आणि करिनाने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :सैफ अली खान तैमुरकरिना कपूर