Join us

किस्सा- तब्बू म्हणते, मी आजही अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार, कारण वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 15:34 IST

तब्बू (Tabu) 2017च्या एका मुलाखतीत म्हणाली होती, मी आणि अजय आम्ही गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो.

अजय देवगण (Ajay Devgan) पत्नी कजोल आणि मुलांसोबत  हॅप्पी मॅरिड लाईफ जगतोय, पण त्याची जवळची मैत्रिणी अभिनेत्री तब्बू  (Tabu) मात्र अजूनही सिंगल आहे.तब्बूनं अनेक अभिनेत्यांसोबत चित्रपटात काम केलंय. मात्र तब्बूचा विजयपथ हा सिनेमा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. 1994मध्ये विजयपथ या चित्रपटात तिने अजय देवगणसोबत अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. तब्बू आणि अजयची जोडी त्या काळातही प्रेक्षकांना प्रचंड भावली.

तब्बू 2017च्या एका मुलाखतीत म्हणाली, मी आणि अजय आम्ही गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, अजय हा माझ्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. तसेच त्यावेळी तो माझा खूप चांगला मित्रसुद्धा होता. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात माझा चुलत भाऊ समीर आणि अजय दोघे माझ्यासोबत असायचे.

प्रत्येक ठिकाणी माझ्याबरोबर यायचे. माझ्याशी कोणीही मुलगा बोलण्यासाठी आल्यास हे दोघे त्यांना धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजय देवगणला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असं तब्बू म्हणाली होती.

अजय देवगन आणि तब्बूची जोडी चाहत्यांना ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीनसुद्धा आवडली. तब्बूचे 'रुक, रुक, रुक अरे बाबा रुक' हे गाणे खूप लोकप्रिय झाली.अभिनेत्री तब्बूचे आजही अनेक चाहते आहेत. 80 ते 90च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 1980मधल्या बाजार चित्रपटात तब्बू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट गाजवले.

टॅग्स :तब्बूअजय देवगण