Join us
Daily Top 2Weekly Top 5

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परतणार दिशा वाकानी? या फोटोमुळे माजली खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 16:32 IST

आता दिशा मालिकेत परतणार असल्याचा उल्लेख मालिकेत नुकताच करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदिशा वाकानी गेल्या तीन वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. दिशाने सप्टेंबर २०१७ मध्ये मॅटरनिटी लीव्ह घेतली होती. त्यानंतर ती या मालिकेत परत आली नाही.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वाकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वाकानी मालिकेतून गायब आहे. तिच्या कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता दिशा मालिकेत परतणार असल्याचा उल्लेख मालिकेत नुकताच करण्यात आला आहे. 

दिशा वाकानी गेल्या तीन वर्षांपासून मालिकेपासून दूर आहे. दिशाने सप्टेंबर २०१७ मध्ये मॅटरनिटी लीव्ह घेतली होती. त्यानंतर ती या मालिकेत परत आली नाही. दिशाला तिच्या लहान मुलाला वेळ द्यायचा होता. त्यामुळे ती मालिकेत काम करत नव्हती. पण आता नुकत्याच झालेल्या एका भागात दिशा परतणार असल्याचा उल्लेख मालिकेत करण्यात आला आहे. अंजली आणि तारक मेहताने २०२१ मध्ये दयाला घरी परत आणण्याचे मिशन हाती घेतले आहे. तसेच पोपलालचे देखील २०२१ मध्ये लग्न लावायचे असे देखील गोकुळधामवासियांनी ठरवले आहे.

तसेच दिशा वाकानीच्या फॅन पेजवरील सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नुकताच एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत आपल्याला निर्माते असित कुमार मोदी, दिलीप जोशी, मुनमन दत्ता आणि दिशा यांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत मुनमुन दत्ता बबिताच्या भूमिकेत दिसत आहे तर दिलीप जोशी जेठालालची भूमिका साकारत आहे.  

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचा टीआरपी सध्या खूप चांगला आहे. लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या नव्या भागांना प्रेक्षकांकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. जर त्यात या मालिकेत दयाबेनची एन्ट्री झाली तर या मालिकेला चारचाँद लागतील.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बहुतांश कलाकारांची ही पहिलीच मालिका होती. पण त्यांच्या पहिल्याच मालिकेने त्यांना खूप फेमस बनवले. आज जेठालाल, दया, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक मेहता, अंजली, अय्यर, बबिता, टप्पू, पोपटलाल, नट्टू काका या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मादिशा वाकानी