Join us
Daily Top 2Weekly Top 5

तापसी पन्नूनं लग्नासाठी लेहेंगा नाही तर सलवार - सूट का निवडला ? खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:52 IST

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते.

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. यातच तापसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तापसी विवाहबंधनात अडकली. तापसी पन्नू हिनं 23 मार्च 2024 रोजी बॉयफ्रेंड मॅथियास बोसोबत लग्न केलं. अभिनेत्रीनं अद्याप लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. लग्नात तापसी हिनं लेहेंगा परिधान केला नव्हता. नुकतेच एका मुलाखतीमध्ये यामागचं कारण तिनं सांगितलं. 

तापसी पन्नू हिनं लग्नात लेहेंग्यावर लाखो रुपये खर्च करणं टाळलं होतं. लेहेंग्याऐवजी तापसीनं  सलवार - सूटची निवड केली होती. लग्नात तापसी ही  सलवार सूट आणि गॉगल अशा एकदम हटके स्टाईलमध्ये दिसून आली. तापसी पन्नूने 'एचटी सिटी'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी शीख, गुरुद्वारातील विवाहसोहळे पाहत मोठी झाली आहे.  मला नेहमी लाल सलवार कमीज आणि बॉर्डर असलेला दुपट्टा घालायचा होता'.

पुढे तिनं सांगितलं की, 'मी पेस्टल रंगाच्या लेहेंग्यात स्वतःची कल्पना करू शकत नाही. ते मला लग्नासारखे वाटतं नाही. मी लेहेंगा निवडला नाही. कारण मला खूप डान्स करायचा होता'. शिवाय, तापसीचा ड्रेस तिच्या मैत्रिणीनं डिझाइन केला होता. अभिनेत्री म्हणाली, मला लग्न समारंभ खाजगी व्हावा अशी इच्छा होती आणि मोठ्या डिझायनर्सची निवड करणे अडचणीचे ठरलं असतं'.

२०१३ मध्ये तापसी आणि मॅथियासची मैत्री झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले. या दोघांनी २२ मार्च रोजी उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. तापसीने सोशल मीडियावरील सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर तिच्या नात्याबद्दल कधीही बोलली नाही. तापसीचा पती मॅथियास हा एक बॅडमिंटनपटू आहे. त्याने ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

टॅग्स :तापसी पन्नूसेलिब्रिटीलग्न