Join us
Daily Top 2Weekly Top 5

नजरेला नजर भीडली...शाळेत एका मुलीच्या प्रेमात पडला होता ‘ताली’ फेम सुव्रत जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 19:18 IST

सुव्रत जोशीचं पहिलं प्रेम हे सखी नाही, तर दुसरीचं मुलगी आहे. नुकतच एका मुलाखतीमध्ये त्यानं याबाबत खुलासा केलायं. 

मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतील क्युट कपल म्हणून अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांची ओळख आहे. दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतून हे दोघेही घरोघरी पोहचले. मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. एप्रिल २०१९ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण, तुम्हाला माहितयं का सुव्रत जोशीचं पहिलं प्रेम हे सखी नाही, तर दुसरीचं मुलगी आहे. नुकतच एका मुलाखतीमध्ये त्यानं याबाबत खुलासा केलायं. 

मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुव्रतनं शाळेतील एका मुलीवर प्रेम होतं, याचा खुलासा आहे. तो म्हणाला, 'प्रेम म्हटलं की आता अर्थातचं मनात सखीचं नावं येतं. पण, माझी पहिली क्रश शाळेत होती. मला आठवतं, आमच्या शाळेची ट्रिप होती, आम्ही उटीला चाललो होतो. तेव्हा उटीच्या रस्त्यावर चहाच्या दुकानाजवळ एक हॅन्डी क्राफ्ट दुकान होतं. तेव्हा मी तिला पाहिलं, माझ्यासोबत काय होतयं हे मलाच कळेना. पहिल्यांदाच एका मुलीबाबत मला असं फिल होत होतं. मी लगेच बसमध्ये गेलो आणि मागे जाऊन एकटाच बसलो. मला अजूनही आठवतं की तिने ब्लॅक पोलो नेक स्वेटर घातलं होतं. ती मला शाळेत ज्युनिअर होती'.

अभिनेता सुव्रत जोशी आपल्या दमदार अभिनयामुळे मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं हिंदी मनोरंजनसृष्टीतही उत्कृष्ट अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुव्रत जोशीने अलीकडेच सुश्मिता सेन प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘ताली’ सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. या वेब सीरिजमधील त्याच्या कामाच अजूनही कौतुक होत आहे.  त्यापूर्वी त्यानं ‘IB 71’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. असा हा हरहुन्नरी सुव्रत सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. व्हिडीओ, फोटो यापलिकडे तो स्वतःची परखड मत व्यक्त करत असतो.
टॅग्स :सुव्रत जोशीमराठी अभिनेतासिनेमासेलिब्रिटीफॅशन