Join us

स्वप्निलचा नवा लूक!

By admin | Updated: May 26, 2015 23:44 IST

मराठीमध्ये सध्या सर्वात लोकप्रिय असणारा हीरो म्हणजे स्वप्निल जोशी. त्याच्या अभिनयाचे चाहते मराठीतच नाहीत तर हिंदीतही आहेत.

मराठीमध्ये सध्या सर्वात लोकप्रिय असणारा हीरो म्हणजे स्वप्निल जोशी. त्याच्या अभिनयाचे चाहते मराठीतच नाहीत तर हिंदीतही आहेत. त्याच्या अभिनयाबरोबरच लूकही चर्चेचा विषय राहिला आहे. स्वप्निलच्या ‘दुनियादारी’मधील कॉलेज कुमाराच्या भूमिकेने सर्वांनाच थक्क केले होते. ‘मितवा’मध्ये हॅण्डसम तरुण बिझनेसमनच्या भूमिकेत पाहिलेल्या स्वप्निलचा पुन्हा एकदा नवीन लूक पाहायला मिळणार आहे. इतर वेळी स्वप्निल भरगच्च दाढीमध्ये वावरत असतो. पार्टी असो किंवा कोणताही समारंभ, त्याला त्याची दाढी फार प्रिय आहे म्हणे. पण त्याच्या आगामी ‘तू ही रे’ चित्रपटात त्याने चक्क क्लीन शेव्ह केली आहे. मनावर दगड ठेवूनच त्याने ही दाढी काढली आहे.