लोकमत सखी मंच सभासद नोंदणी सध्या महाराष्टभर सुरू आहे. महिलांचा या नोंदणीस अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे. लोकमत सखी मंचने आजपर्यंत राबवलेल्या अनेक दर्जेदार उपक्रमांचा महिलांनी लाभ घेतला आहे. सखी मंच उपक्रमाबाबत जाणून घेण्याची इच्छा खुद्द अभिनेता स्वप्नील जोशीला झाली. मग काय या चॉकलेट बॉयने थेट सखी मंचच्या समन्वयक महिलांना गाठून सखी मंच सभासदांशी थेट संवादही साधला. महाराष्ट्रातील आधुनिक स्त्रीसाठी लोकमत सखी मंच निर्माण केलेलं असं अर्थपूर्ण, सर्वांग सुंदर व्यासपीठ आहे. या उपक्रमाची समाजातील प्रतिष्ठित लोकांनीही दखल घेतली आहे. व्यासपीठावर विविध उपक्रमांद्वारे तिला मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी मिळते. स्त्री सवलीकरणासारख्या वैविध्यपूर्ण मुद्दयांवरती तिला संवादकौशल्यासह आपली मतं खुलेपणाने कशी मांडता येतील यासाठी पण लोकमत सखी मंच नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. त्यासाठी सखी मंचच्या वतीने दर महिन्याला आरोग्य, सौंदर्य, स्वयंपाक कौशल्य, आहार, पालकत्व, संगीत, व नृत्य, व्यक्तिमत्व विकास, करियर मार्गदर्शन व इतरही अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. या माध्यमातून महिलांचे एकमेकींशी सतत मैत्रीपूर्ण संबंध विकसित होताना समाजाशी असलेले ऋणानुबंध यांची ही अनोख्या रितीने जपणूक होते.
स्वप्निलला भेटून भारावल्या सखी!
By admin | Updated: March 11, 2017 02:49 IST