Join us

स्वप्नील जोशी स्त्री वेशात

By admin | Updated: February 10, 2017 03:38 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत स्त्री वेशात भूमिका करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. भाऊ कदम, सुबोध भावे, कुशल भद्रिके यांच्यापाठोपाठ

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत स्त्री वेशात भूमिका करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. भाऊ कदम, सुबोध भावे, कुशल भद्रिके यांच्यापाठोपाठ आता प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी लवकरच ‘फुगे’ या चित्रपटात स्त्री वेशात दिसणार आहे. त्यामुळे त्याची ही हटके भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. या चित्रपटातील लाल रंगाचा ड्रेस, त्याला साजेशी अशी लाल लिपस्टिक आणि नाजूक असे काळे कानातले त्याने घातले आहे. त्याचा हा लूक पाहून स्वप्निलचे चाहते नक्कीच आश्चर्यचकित होतील, यात शंकाच नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वप्निल जोशी हा पहिल्यांदाच स्त्री भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी तो हिंदीमध्ये ‘कॉमेडी सर्क स’ या शोमध्ये स्त्री भूमिकेत पाहायला मिळाला होता. चित्रपटाच्या कथेची गरज ओळखून त्याने हे पात्र साकारल्याचे समजत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित हा चित्रपट असून, सध्या या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. तसेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. चित्रपटात सुबोध भावे, प्रार्थना बेहरे, नीता शेट्टी या कलाकारांचा समावेश आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत, एस. टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांनी ‘फुगे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना १० फेब्रुवारीला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.