सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान ही जोडी पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एकत्र येत आहे. या जोडीची पहिली झलक समोर येताच अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मालिकेच्या प्रोमोला मिळालेलं भरभरून प्रेम मिळत आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatalihi Tutena Serial) या नव्या मालिकेने पहिल्याच क्षणात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावरून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळालं असून या शीर्षकाने एक वेगळं आकर्षण निर्माण केलं आहे. 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदारची भूमिका साकारते आहे. जबाबदारीने आयुष्य जगणारी, प्रेम आणि लग्न या गोष्टी कायमच मागे टाकून कुटुंबासाठी झटणारी ३५ वर्षीय स्त्री. तर सुबोध भावे समर राजवाडेची भूमिका निभावतो आहे. एक यशस्वी व्यावसायिक आणि मनाने भावनिक माणूस, जो आपल्या भावंडांना आईवडिलांप्रमाणे प्रेम करतो आणि वाढवतोय. या दोन्ही पात्रांची परिस्थिती भिन्न असूनही कुटुंबासाठी निर्माण झालेलं नातं नंतर प्रेमात कसं रूपांतरित होतं, हे पाहणं हीच या मालिकेची खरी गोडी आहे.
स्वानंदी आणि समरची अनोखी प्रेमकथा 'वीण दोघातलीही तुटेना'मध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:26 IST
Veen Doghatalihi Tutena Serial :'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदारची आणि सुबोध भावे समर राजवाडेची भूमिका साकारतो आहे.
स्वानंदी आणि समरची अनोखी प्रेमकथा 'वीण दोघातलीही तुटेना'मध्ये
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}