Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिर्फ आँकडे... इधर मौत के उधर सीटों के...! तुफान व्हायरल होतेय स्वानंद किरकिरे यांचं ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 14:33 IST

स्वानंद किरकिरे यांचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. शेकडो लोकांनी त्यांचे हे ट्विट रिट्विट केले आहे.

ठळक मुद्दे स्वानंद यांनी  बर्फी, लागा चुनरी में डाग, थ्री इडियट्स, परिणीता अशा अनेक सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गाण्यांना आपला सुरेख आवाज दिला आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुचेरी या पाच राज्यांतील निवडणूक निकाल लवकरच जाहीर होत आहेत. सध्या या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. साहजिकच कोण जिंकणार, कोण हरणार, कोणाला सत्ता मिळणार यावरच्या चर्चा सुरू आहेत. आकड्यांची जुळवाजुळव आणि राजकीय समीकरणांनाही वेग आला आहे. दुसरीकडे देशात कोरोना रूग्णांचे वाढते आकडे धडकी भरवत आहेत. या पार्श्वभूमीवर गीतकार व गायक स्वानंद किरकिरे (Swanand Kirkire ) यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.

‘सिर्फ आँकडे... इधर मौत के उधर सीटों के... कहीं तो होंगे आँकडे शर्म से झुकतो सरों के, रोज जूझते लडते नर्सों डॉक्टरों के...,’असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले आहे.स्वानंद किरकिरे यांचे हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होत आहे. शेकडो लोकांनी त्यांचे हे ट्विट रिट्विट केले आहे.याआधी स्वानंद किरकिरे यांचे एक ट्विट असेच चर्चेत आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी निवडणूक आयोगाच्या जिव्हारी लागली होती. या टिप्पण्यांविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर भाष्य करताना स्वानंद किरकिरे यांनी एक ट्विट केले होते.

‘इमेज की चिंता है, हमें बस इमेज की चिंता...चाहे मरे आवाम निरंतर जले चिता,’ असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांचे हे ट्विटही चांगलेच व्हायरल झाले होते. स्वानंद यांनी  बर्फी, लागा चुनरी में डाग, थ्री इडियट्स, परिणीता अशा अनेक सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गाण्यांना आपला सुरेख आवाज दिला आहे. तर पा, राजनिती, पीपली लाइव्ह, फेरारी की सवारी अशा अनेक बॉलिवुड चित्रपटांचे गीतलेखनदेखील केले आहे. त्याचबरोबर देऊळ, बालगंधर्व या मराठी चित्रपटांचे गीतलेखनदेखील केले आहे. 

 

 

टॅग्स :स्वानंद किरकिरे