Join us

सुयशने केली गणेशमूर्ती दान

By admin | Updated: September 19, 2016 02:06 IST

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी दरवर्षीच गाजत-वाजत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका निघल्याचे आपण पाहतो.

गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी दरवर्षीच गाजत-वाजत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका निघल्याचे आपण पाहतो. बऱ्याचदा सामाजिक आणि पर्यावरणाची काळजी करणारे लोक गणेशोत्सवात प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती न वापरता शाडूची मूर्ती आणतात. परंतु अभिनेता सुयश टिळकने यापुढे एक पाऊल टाकत पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी चक्क गणेशमूर्तीचे विसर्जनच केले नाही. त्याचबरोबर सुयशने त्याच्या घरच्या बाप्पाचे विसर्जन न करता गणेशमूर्तीचे दान केले आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आणि संकल्पनेचे सुयशचे चाहते त्याचे कौतुक करतायेत. सुयश नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे वेळोवळी दिसून आले आहे. बाप्पांच्या मूर्तीचे दान करून एक नवीन पायंडा त्याने रचलाय. याबद्दल सुयश सांगतो, ‘‘मूर्तीदान जलसृष्टीला जीवनदान या ब्रीदवाक्यानुसार गणेश विसर्जनाला एक चांगला पर्याय मिळाला आहे. कलाकारांना नेहमीच फॉलो करणारे त्यांचे चाहते आता अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांनाही नक्कीच हातभार लावतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही’’.