Join us

सुयशला क्रिकेटचे वेड

By admin | Updated: May 12, 2015 23:14 IST

मालिका, सिनेमांच्या शूटिंगचे शेड्युल्ड कायमच कलाकारांना सांभाळावे लागते, मात्र या टायमिंगमुळे कलाकारांना आपल्या आवडीनिवडींना फारसा

मालिका, सिनेमांच्या शूटिंगचे शेड्युल्ड कायमच कलाकारांना सांभाळावे लागते, मात्र या टायमिंगमुळे कलाकारांना आपल्या आवडीनिवडींना फारसा वेळ देता येत नाही. परंतु, यामुळे निराश न होता अभिनेता सुयश टिळक याने अनोखी शक्कल लढविली आहे. मालिकेच्या शूटिंगच्या सेटवरच बॅट-बॉल हातात घेऊन क्रिकेटचा सामना सुरू केला आणि मग काय बघता-बघता सेटवरची सगळी मंडळी शूटिंग सोडून क्रिकेट खेळण्यात मग्न होतात.