Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐकलंत का! हृतिक रोशनची पत्नी सुजैन खान परतली त्याच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 17:25 IST

सुजैन गेल्या काही दिवसांपासून हृतिकच्याच घरी राहात आहे.

ठळक मुद्देहृतिकची पत्नी सुझान आता त्यांच्या दोन्ही मुलांची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी परतली आहे. सध्या हृतिक आणि सुझान आपल्या मुलांसोबत हृतिकच्या घरी वेळ घालवत आहेत.

हृतिक रोशनची गणना आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये होते. त्याचे लग्न काही वर्षांपूर्वी सुजैन खानसोबत झाले होते. सुजैन ही प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. सुजैन आणि हृतिक लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले. पण हे लग्न काहीच वर्षांत मोडले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना दोन मुलं असून ते दोघेही हृतिकसोबत राहातात. त्यांचा घटस्फोट झाला असला तरी ते दोघे त्यांच्या मुलांसाठी अनेकवेळा एकत्र येतात. पण आता चक्क सुजैन हृतिकच्या घरी परतली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून हृतिकच्याच घरी राहात आहे. सुजैनने हृतिकच्या घरी परतण्यामागे एक खास कारण आहे.

सध्या कोरोनाने जगभरात थैमान घातले असून भारतात देखील कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरातच थांबत आहेत. हृतिकची पत्नी सुजैन आता त्यांच्या दोन्ही मुलांची काळजी घेण्यासाठी त्याच्या घरी परतली आहे. सध्या हृतिक आणि सुजैन आपल्या मुलांसोबत हृतिकच्या घरी वेळ घालवत आहेत. लॉकडाऊन असल्याने हृतिकची मुलं घराच्या बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांची आईसोबत कित्येक दिवस भेट झाली नसती. त्यामुळे सुजैनने हृतिकच्या घरी परतण्याचे ठरवले आणि या तिच्या निर्णयासाठी हृतिकने तिचे आभार मानले आाहेत.

हृतिकनेच सोशल मीडियाद्वारे ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. त्याने सुजैनचा एक फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, देशात सध्या लॉकडाऊन असल्याने मुलांना आपल्या आई-वडिलांपासून वेगळे राहावे लागेल हा विचार देखील आम्ही करू शकत नाही. आमच्या मुलांसोबत आई वडील दोघेही असावेत त्यामुळे सुजैन काही दिवसांसाठी माझ्या घरी परत राहायला आली आहे. सुजैनने घेतलेल्या या निर्णयासाठी मी तिचे आभार मानतो. आमच्या मुलांसाठी ही गोष्ट खास असून ते ही गोष्ट नक्कीच सगळ्यांना सांगतील.  

टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खान