शेखर कपूर यांच्या पाणी या ड्रीम प्रोजेक्टमधून सुशांत सिंह राजपूतने माघार घेतली आहे. सुशांत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार होता. पण आता त्यानेच माघार घेतल्याचे कळते. सूत्रांनुसार सुशांतने चित्रपटासाठी पूर्ण तयारी केली होती, तो आता चित्रिकरणाच्या प्रतीक्षेत होता. पण काही ना काही कारणामुळे चित्रिकरणाला उशीर लागत असल्याने शेवटी सुशांतनेच हा चित्रपट सोडला. सूत्रांनी सांगितले की, ‘जेव्हापासून चित्रपटाची घोषणा झाली आहे, काही ना काही समस्या निर्माण होत आहेत; त्यामुळे चित्रपटाचे शूटिंगही सुरू होऊ शकले नाही. या नोव्हेंबरमध्ये चित्रपट सुरू होण्याचे ठरले होते, पण आता हे चित्रिकरण वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.’ सध्या डिटेक्टिव व्योमकेश बक्शी या चित्रपटाच्या चित्रिकरणात बिझी असलेल्या सुशांतने ‘पाणी’मुळे अनेक चांगले चित्रपट सोडले आहेत; त्यामुळेही तो नाराज असल्याचे कळते.
‘पाणी’तून सुशांतची माघार
By admin | Updated: September 26, 2014 04:04 IST
शेखर कपूर यांच्या पाणी या ड्रीम प्रोजेक्टमधून सुशांत सिंह राजपूतने माघार घेतली आहे. सुशांत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार होता
‘पाणी’तून सुशांतची माघार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}