Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरेखा सिक्रीची रूद्रच्या आयुष्यात एन्ट्री

By admin | Updated: January 22, 2015 23:36 IST

दादीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर अवतरणार आहे.

दादीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर अवतरणार आहे. ‘महाकुंभ-एक रहस्य, एक कहानी’ या मालिकेत रूद्रच्या दादीच्या भूमिकेत सुरेखा दिसणार आहे. ती योगिनीच्या रूपात रूद्रसमोर तब्बल एक दशकानंतर येणार आहे. माई मुई आणि ऊडिया बाबा यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आलेल्या रूद्र, माया आणि तपाडिया माई यांच्याशी अलाहाबादला कुंभमेळ्यात तिची भेट होते.