Join us
Daily Top 2Weekly Top 5

लादेन होता सनीच्या पॉर्न फिल्मचा वेडा !

By admin | Updated: November 17, 2016 23:14 IST

दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पॉर्न स्टार सनी लिओनीच्या पॉर्न फिल्मचा वेडा होता, अशी माहिती सनी लिओनीच्या जीवनावर आधारित लघुपटातून समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 17 - दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पॉर्न स्टार सनी लिओनीच्या पॉर्न फिल्मचा वेडा होता, अशी माहिती सनी लिओनीच्या जीवनावर आधारित लघुपटातून समोर आली आहे. 
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनी लिओनीच्या जीननावर आधारित 'मोस्टली सनी' या नावाचा हा लघुपट आहे. या लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून दिग्दर्शक दिलीप मेहता सध्या या लघुपटावर काम करत आहेत.
जगभरात सनी लिओनीचे अनेक चाहते आहेतच, पण ज्यावेळी सनी लिओनी पॉर्न फिल्मसाठी काम करायची त्याकाळात तिच्या पॉर्न फिल्म पाहण्यास दहशतवाद्यांचा म्होरक्या ओसामा बिन लादेन जास्त उतावळा होता, असे या लघुपटातून समोर आले आहे. ओसामा बिन लादेन ज्यावेळी पाकिस्तानात होता, त्यावेळी त्याच्याकडे सनी लिओनी असलेल्या पॉर्न फिल्मच्या अनेक सीडीज् सापडल्या होत्या. 
या लघुपटात सनी लिओनीच्या आयुष्याशी संबंधीत अनेक घटनांचा उलघडा करण्यात येणार आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर तिच्या या लघुपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनच उत्सुकता वाढेल यात काही शंका नाही.