‘बे ईमान लव्ह’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव चौधरी सनी लिओनी हिच्या अभिनयाबद्दल बोलतांना म्हणाले,‘मुख्य प्रवाहातील अभिनेत्री बनणे सनीसाठी फार काही कठीण नाही. कारण तिचा अभिनय पाहिल्यास कुणालाही वाटेल की, ती दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा हिच्याएवढे उत्तम अभिनय साकारते. तिला एक भारतीय लुक पहिल्यापासूनच आहे. मी तिला ‘जिस्म २’ आणि ‘रागिनी एमएमएस’ मध्ये पाहिले आहे. ती जो अभिनय सध्या करते आहे, त्यापेक्षाही जास्त उत्तम अभिनय यानंतरही करू शकते. ती नेहमी तिच्या भूमिकेला न्याय देऊन काम करते. ती खरंच खुप उत्साही आणि उत्तम अभिनेत्री आहे. तिला लवकरच तुम्ही एका चांगल्या चित्रपटात नक्की पाहाल.’
सनी टॅलेंटेड हिरोईन!
By admin | Updated: September 18, 2016 01:35 IST