Join us

शाहरुखच्या चित्रपटात सनी लिऑनचं आयटम साँग

By admin | Updated: March 19, 2016 17:53 IST

सनी लिऑन चक्क बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटात आयटम साँग करणार असल्याची माहिती आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १९ - एकेकाळी पॉर्न स्टार म्हणून काम केलेल्या सनी लिओनीचं नशीब आता चांगलंच पलटलं आहे. छोट्या पडद्यावरील 'बिग बॉस'मुळे तिला ख-या अर्थाने यश मिळालं. त्यानंतर तिला बॉलिवूडमध्ये चित्रपटदेखील मिळाले. सुरुवातीला मिळालेले चित्रपट हे तिच्या पॉर्न स्टार इमेजला साजेसे होते त्यामुळे तो शिक्का तिच्यावर कायम होता. मात्र आता सनी लिऑन चक्क बॉलिवूड बादशहा शाहरुख खानच्या चित्रपटात आयटम साँग करणार असल्याची माहिती आहे.
 
बॉलीवूड लाईफ डॉट कॉम या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार सनी लिऑन शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'रईस'मध्ये आयटम साँग करताना दिसण्याची शक्यता आहे. याबद्द्ल अजून माहिती मिळू शकलेली नाही. शाहरुख खानदेखील सनी लिऑनसोबत असणार आहे की नाही ? यासाठी वाट पाहावी लागेल.
 
काही दिवसांपुर्वी मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननेदेखील सनी लिऑनसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. बॉलिवूडमधील खानावळीसोबत काम करायला मिळावं यासाठी अभिनेत्री खटाटोप करत असतात. मात्र सनीचं नशीब याबाबतीत भलतच खुललेलं दिसत आहे.