ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन हिने एका कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेल्या रविवारी या कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले.
कॅलेंडरचे फोटोशूट सनी लिऑनने दिलेल्या मादक अदा छायाचित्रकार डब्बु रत्नानी यांनी टिपल्या आहेत. वेगवेगळ्या १२ पोजेसमध्ये तिचे फोटोशूट करण्यात आले आहेत. कॅलेंडरसाठी फोटोशूटचे आयोजन खास थायलंडमध्ये करण्यात आले होते.
सनी लिऑनने पहिल्यांदाच कॅलेंडरसाठी असे फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ते नक्कीच आवडेल. तसेच, सनी लिऑनने आत्तापर्यंत हटके चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.