Join us

सनी लिओनची मराठीत व्हल्गर अ‍ॅक्टिव्हिटी

By admin | Updated: July 31, 2015 03:31 IST

सनी लिओन मराठीमध्ये ‘व्हल्गर अ‍ॅक्टिव्हिटी’ करायला तयार आहे म्हणतात... हो खरंच. दिग्दर्शक सुजय डहाके ‘व्हल्गर अ‍ॅक्टिव्हिटी इनकॉपर्स’ नावाचा चित्रपट बनविण्याच्या विचारात आहेत.

सनी लिओन मराठीमध्ये ‘व्हल्गर अ‍ॅक्टिव्हिटी’ करायला तयार आहे म्हणतात... हो खरंच. दिग्दर्शक सुजय डहाके ‘व्हल्गर अ‍ॅक्टिव्हिटी इनकॉपर्स’ नावाचा चित्रपट बनविण्याच्या विचारात आहेत. यासाठी त्यांना सनीच हवी आहे. अगदी सनी मिळाली नाही, तर चित्रपटच करायचा नाही, असे त्यांनी ठरविले आहे. सुजयच्या ‘फुनथ्रु’ या चित्रपटाची चर्चा सध्या सुरू आहे. यामध्ये केतकी माटेगावकरचा अगदी वेगळा लूक आहे. याच चित्रपटाबरोबर सुजय आपल्या दुसऱ्या चित्रपटाचीही तयारी करत आहे. चित्रपटाचा नाव आणि विषय पाहून त्याला सनीची गरज का भासतेय, हे दिसतेय. यासाठी त्याने सनीचा नवरा डॅनीयल याच्याशीही संपर्क केला आहे. डॅनीयलकडून सकारात्मक प्रतिसादही आला आहे असे म्हणतात. शाळा, आजोबा असे आशयगर्भ चित्रपट देणारा सुजय या निमित्तानेही काही वेगळा विषय समोर आणेल.