Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिऑनला विणकामाचीही हौस

By admin | Updated: May 3, 2016 16:09 IST

अहो, सनी सारखी ग्लॅमडॉल फावल्या वेळात विणकाम करीत असेल, असे तुम्हाला स्वप्नातही वाटणार नाही. पण सनीला म्हणे, विणकामाची प्रचंड आवड आहे

- सीएनएक्स एक्सक्लुझिव्ह
ग्लॅमडॉल सनी लिओनी बॉलिवूडमध्ये चांगलीच स्थिरावलीयं. पॉर्न स्टार अशी ओळख घेऊन आलेल्या सनीचे बॉलिवूडमध्ये कसे निभावेल, असाच प्रश्न होता. पण सनीने सगळ्यांनाच आश्चर्यचकित करीत, बॉलिवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता तर तिने आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. अहो, सनी सारखी ग्लॅमडॉल फावल्या वेळात विणकाम करीत असेल, असे तुम्हाला स्वप्नातही वाटणार नाही. पण सनीला म्हणे, विणकामाची प्रचंड आवड आहे.
 
आपल्या मित्रंच्या चिमुकल्यांसाठी अनेक ब्लँकेट सनीने विणली आहेत.   ‘यार मेरा सुपरस्टार’ या टीव्ही शोवर ‘वन नाईट स्टँड’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली असता खुद्द सनीनेच ही माहिती दिली. कदाचित मी खोटे बोलतेयं असे लोकांना  वाटेलं. पण मला विणकामाची प्रचंड आवड आहे. माझ्या मित्रंच्या मुलांना हाताने विणलेली अनेक ब्लँकेट मी गिफ्ट दिली आहेत. सध्या मी माझ्या भावासाठी ब्लँकेट विणते आहे, असेही तिने सांगितले.