Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिओनी झाली शाहरुख खानची लैला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 10:34 IST

'रईस'मधील सनी लिओनीचे लैला मै लैला गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.22 -  बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आगामी सिनेमा 'रईस'मध्ये सनी लिओनीची बरीच चर्चा सुरू आहे. कारण या सिनेमामध्ये सनीने 'लैला मै लैला' या गाण्यावर आयटम साँग केले आहे. 'लैला मै लैला' हे मूळ गाणं जीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्याच्या या नवीन वर्जनमध्ये सनी नेहमी प्रमाणे बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे. गाण्यातील तिच्या मादक अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. 
 
बुधवारी सोशल मीडियावर सनीच्या या गाण्याने धुमाकूळ घातला.  या गाण्याच्या निमित्ताने शाहरुख खान आणि सनी लिओनी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया यांनी केले आहे.  25 जानेवारी 2017 रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.