Join us

फोटोत दिसणारी चिमुरडीला ओळखले का? आज बनली आहे सगळ्यात बोल्ड अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 15:06 IST

सनी लिओनी सेक्सुअलिटी आणि एचआयव्हीबाबत परखडं बोलते.हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय. सध्या ती तिच्या आयुष्यात रमली आहे.

सनी लिओनी आपल्या मादक अदांमुळे बॉलीवुडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात सनी अनेक गाण्यांवर थिरकली आहे. सनीवर चित्रीत करण्यात आलेल्या आयटम नंबर्सना रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे वाट्टेल तितका पैसा मोजून सनीला आपल्या सिनेमात नाचवण्यासाठी निर्माते दिग्दर्शक एका पायावर तयार असतात. कोट्यवधी रुपये मानधन थिरकणारी सनीचा लहानपणीचा फोटो समोर आला आहे.

 या फोटोंत निरागस चेहरा, चेह-यावरील स्मित हास्य पाहायला मिळत असून तिने लाल रंगाचा फ्रॉक आणि केसांना पांढ-या रंगाची हेअर क्लिप लावली आहे. या फोटोत ती खूप क्युट दिसत आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स केल्याचे पाहायला मिळत आहे. टीक टॉकमध्ये बनवलेला या व्हिडीओत करणजीत कौर ते सनी लियोनी बनण्यापर्यंतची जर्नी पाहायला मिळत आहे. 

ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सनी प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे. बॉलीवुडमध्ये एडल्ट सिनेमांविषयी ती सारी जबाबदारी सरकारवर टाकतेय... तसंच सेक्सुअलिटी आणि एचआयव्हीबाबत परखडं बोलते.हॉट अदा आणि आयटम नंबर करणा-या सनीला आता काही तरी वेगळं करायचंय. सध्या ती तिच्या आयुष्यात रमली आहे. ब-याच दिवसांपासून रूपेरी पडद्यावर तिचे दर्शन घडले नसले तरीही तरी पर्सनल लाईफमध्ये सनी सध्या खूष आहे... एकूणच काय ही सध्या बॉलीवुड आणि फॅन्समध्ये फक्त सनी लिओनीची हवा आहे. 

टॅग्स :सनी लिओनी