Join us
Daily Top 2Weekly Top 5

अरबाज खानने प्रश्न विचारताच ढसाढसा रडू लागली होती सनी लिओनी, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 15:17 IST

सनी लिओनी आपल्या बोल्ड अदांमुळे बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.

बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी लाखो लोकांना वेड लावणारी सनी लिओनी आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बी-टाऊनच्या टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीत सनी लिओनीचं सामील आहे.  सनी नेहमी तिच्या भूतकाळातील आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत असते.

सनी तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सनीचा हा अंदाज अरबाज खानच्या चॅट शो पिंच बायमध्ये पाहायला मिळाला होता. या शोमध्ये, अरबाजने विचारलेल्या एका प्रश्नामुळे सनी इतकी दु: खी झाली की ती शोमध्ये ढसा-ढसा रडू लागली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि त्याची बरीच चर्चादेखील झाली होती.

वास्तविक, सनी सन 2019 मध्ये  'पिंच बाय' मध्ये पाहुणी म्हणून आली होती. शो दरम्यान, अरबाज जेव्हा सनीला जुन्या पोस्टवर केलेल्या कमेंटचा संदर्भ देत प्रश्न विचारला होता. सनीने एका पोस्टच्या माध्यमातून प्रभाकर नावाच्या व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मदत मागितली होती. सनी लिओनीची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती आणि लोकांनी तिला बरीच ट्रोल केले होते.

अरबाजच्या प्रश्नाचे उत्तर देताना रडली होती सनी लिओनी  सनीने जेव्हा या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगण्यास सुरूवात केली तेव्हा ती प्रचंड रडली होती. सनी म्हणाली की, आम्ही त्याला वाचवू शकलो नाही, हे फार वाईट आहे.  प्रभाकर नावाच्या व्यक्तिला सनीची मुलगी निशा मामा म्हणून आवाज द्यायची. तो सनीचा मानलेला भाऊ होता.  प्रभाकर गंभीर आजाराने ग्रस्त होता, त्याचे मूत्रपिंड खराब झाले आणि डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. याचा संबंध सनीने पोस्ट केली होती.

सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या ५ व्या सीझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच रियालिटी शोमुळे ती प्रकाशझोतात आली होती. सनी लिओनी आपल्या बोल्ड अदांमुळे बॉलीवुडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात सनी अनेक गाण्यांवर थिरकली आहे.

टॅग्स :सनी लिओनीअरबाज खान