Join us

सनी लिओनीला दर पंधरा मिनिटाला करावी लागते ही गोष्ट... नाही तर ती होते प्रचंड बैचेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 16:19 IST

सनीनेच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. ही गोष्ट काय आहे हे वाचल्यावर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल.

ठळक मुद्देसनीला एक वाईट सवय असून या सवयीमुळे ती देखील कंटाळली आहे. तिनेच या सवयीविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. सनीची ही विचित्र सवय काय आहे हे तिच्या चाहत्यांना कळले, तेव्हा अनेकांना त्यावर विश्वास बसला नाही.

ती आहे बोल्ड, ती आहे बिनधास्त... ती आहे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटी, नेटिझन्सना तिने अक्षरक्षः वेड लावलं आहे. बॉलीवुडची मस्तानी, देसी गर्लसुद्धा तिच्यापुढे फ्लॉप. ही ती म्हणजे पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनी. इंडो-कैनेडियन असलेल्या सनी लिओनीचा आज वाढदिवस असून तिने एक पॉर्नस्टार म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली.

सनीने 'जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. 'बिग बॉसच्या ५ व्या' सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.

सनीला एक वाईट सवय असून या सवयीमुळे ती देखील कंटाळली आहे. तिनेच या सवयीविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. सनीची ही विचित्र सवय काय आहे हे तिच्या चाहत्यांना कळले, तेव्हा अनेकांना त्यावर विश्वास बसला नाही. पण ‘जिस्म 2’च्या शूटींगदरम्यान सनी लिओनीने हा खुलासा केला होता. या विचित्र सवयीमुळे सनीला अनेकदा शूटींगसाठी उशीर होतो. आता ही विचित्र सवय कुठली तर सनी दर १५ मिनिटांनी पाय धुते. पाय धुतल्याशिवाय तिला चैन पडत नाही. काहींना मिनिटा मिनिटाला हात धुण्याची सवय असते. तसेच सनीला दर १५ मिनिटांला पाय धुण्याची सवय आहे. या सवयीच्या ती एवढी आहारी गेलीय की, याच कारणामुळे तिला सेटवर पोहोचायला उशीर होतो.

सनीने काही महिन्यांपूर्वी तिचा अगदी बालपणापासून ते बॉलीवूडपर्यंतचा जीवनप्रवास तिच्या वेब सीरिजच्या माध्यमातून लोकांसमोर आणला होता. सनीची वेबसीरिज 'करणजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' रिलीज झाल्यानंतर तिचं अवघं आयुष्य एका पुस्तकाप्रमाणे जगासमोर आलं. सनीच्या या वेबसिरिजला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

 

टॅग्स :सनी लिओनी