Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी लिऑन बनणार 'संस्कारी'?

By admin | Updated: December 8, 2015 14:54 IST

बोल्ड व हॉट दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिऑन ही लवकरच 'संस्कारी' बनणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - बोल्ड व हॉट दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिऑन ही लवकरच 'संस्कारी' बनणार आहे. सलमान खानचा 'रेडी' व अक्षय कुमारचा 'थॅक यू' चित्रपट लिहीणारे इक्रम अख्तर हे 'यारों की बारात' या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच दिग्दर्शनात उतरणार आहेत.
तीन मित्रांच्या या चित्रपटात सनी एक पंजाबी तरूणीची भूमिका करणार असून परदेशी शिक्षण घेतलेले असूनही ती संस्कार जपणारी, भारतीय पेहरावात वावरणारी तरूणी साकारणार आहे. पण संस्कारी मुलीची भूमिका करतानाच ती त्या तीन मित्रांच्या कल्पनाविलासातील एक हॉट तरूणी रंगवणार आहे.