निर्माता बॉबी खानने त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या ‘लीला’ या हिंदी चित्रपटात सनी लियोनला घेतले आहे. हा एक फॅमिली ड्रामा असून चित्रपटाला यु/ ए सर्टिफिकेट मिळावे, अशी त्याची इच्छा आहे. बॉबीच्या मते, चित्रपटाची स्क्रिप्ट खूपच दमदार असून ही एक स्वच्छ कौटुंबिक कथा आहे; पण यात सनी मुख्य भूमिकेत असल्याने या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. मी प्रेक्षकांना धोका देऊ शकत नाही. फॅमिली ड्रामा असला तरी या चित्रपटात सनी ग्लॅमरस लूकमध्ये दिसेल. चित्रपटात सनी तीन भूमिका निभावणार आहे, त्यामुळे तिचे वेगळे लूक पाहायला मिळतील.’
कुटुंबियांसोबत पाहता येईल सनीचा लीला?
By admin | Updated: October 12, 2014 00:33 IST