Join us

विवाहीत असूनही सनी देओल होता 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात, लग्नाची बातमी ठेवली होती लपवून

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 14:36 IST

सनी देओलने जेव्हा रूपेरी पडद्यावर एंट्री केली तेव्हा हळुहळु त्याची लोकप्रियतादेखील वाढु लागली होती. धर्मेंद्र यांनीच सनीचे लग्न जगासमोर येऊ दिले नसल्याचे बोलले जाते.

अॅक्शन पॅक्ड चित्रपट आणि दमदार डायलॉगसाठी प्रसिद्ध असलेला सनी देओल 65 वर्षाचा झाला आहे. सनी वास्तविक जीवनात खूप लाजाळू स्वभावाचा आहे. फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एकब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेल्या सनीच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे की, त्याने चित्रपटात पाऊल टाकण्यापूर्वीच पूजा नावाच्या मुलीशी लग्न केले होते. 1983 साली बेताब  या चित्रपटातून त्याने पदार्पण केले. या चित्रपटात त्याची नायिका होती अमृता सिंग होती. दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि शूटिंग दरम्यान दोघांमध्येही खूप चांगली मैत्री झाली होती. तिथूनच त्यांच्या प्रेमाचीही सुरुवात झाली. 

चित्रपट रिलीज होताच बी-टाऊन दोघांच्या अफेअरचे जास्त चर्चा झाल्या. विशेष म्हणजे सनीच्या लग्नाविषयी अमृताला जराही कल्पना नव्हती. अमृताचे सनीवर प्रचंड प्रेम होते. सतत दोघांचे नाते लपवणे अमृताला खटकत होते. त्यामुळे तिला त्यांच्या या नात्याविषयी उघडपणे कबुली द्यायची होती, पण सनी यासाठी तयार नव्हता. त्याने आपले आणि अमृताचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले. अमृताला वाटले की सनी तिचा जीवनसाथी होण्यासाठी परफेक्ट चॉईस आहे.पण अमृता सिंगची आई या नात्याच्या विरोधात होती. अमृताने एका मोठ्या कुटुंबातील मुलाशी लग्न करावे अशी तिची इच्छा होती. 

बातमीनुसार, आईची इच्छा लक्षात घेऊन अमृताने सनी देओलच्या कुटुंबाची चौकशी सुरू केली.जेव्हा अमृता सिंग समोर वास्तव समोर आले तेव्हा सत्य समजताच ती पूर्णपणे तुटली होती. सनी हा आधीच विवाहीत आहे. सनीची पत्नी पूजा ही लंडनमध्ये राहत असल्याचे तिला समजले होते. सनी देओलबद्दल सत्य जाणून घेतल्यानंतर, अमृताने त्याच्यापासून दूर गेली. दोघांचे ब्रेकअफ झाल्याच्या काही वर्षानंतर अमृता पुन्हा प्रेमात पडली. तिचे नाव रवी शास्त्रींशीही जोडले गेले, पण हे नाते फार काळ टिकले नाही.  यानंतर सैफ अली खानने अमृताच्या आयुष्यात एंट्री केली. सैफ आणि अमृता दोघांनी 1991 मध्ये लग्न केले.

अमृता सिंगनंतर डिंपल कपाडियाने सनी देओलच्या आयुष्यात एंट्री केली. असे म्हटले जाते की, सनीने डिंपलला त्याच्या पत्नीचाही दर्जा दिला होता,दोघांनीही त्यांचे लव्ह-लाईफ कॅमेऱ्याच्या नजरेपासून लपवून ठेवले. मात्र हे अफेअरही लवकरच जगासमोर आले होते.  त्याला ही बातमी जास्त दिवस लपवून ठेवता आली नाही.

रिपोर्ट्सनुसार, सनीने जेव्हा रूपेरी पडद्यावर एंट्री केली तेव्हा हळुहळु त्याची लोकप्रियतादेखील वाढु लागली होती. धर्मेंद्र यांनीच सनीचे लग्न जगासमोर येऊ दिले नसल्याचे बोलले जाते. लग्नानंतर खूप दिवस पूजा लंडनमध्ये राहिल्या. सनी देखील पूजा यांना भेटण्यासाठी लपून छपून लंडनला येऊन जाऊन असायचा.जेव्हा मीडियामध्ये या दोघांच्या लग्नाच्या बातम्या यायला सुरू झाल्या तेव्हाही लग्नाची बातमी सनीने नाकारली होती. काही काळानंतर सनीनेच लग्न झाल्याची बातमी खरी असल्याची मीडियाला सांगितले होते. आजही सनीने आपली पत्नी आणि आपल्या लाइफ बद्दलच्या गोष्टी प्राइवेटच ठेवणे पसंत करतो.

टॅग्स :सनी देओलअमृता सिंग