प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. मुंबई अग्निशामक दलावर एक चित्रपट बनवला जात असून, या चित्रपटात सुनील शेट्टी अग्निशामक दलातील अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेता श्रेयस तळपदेही या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची कथा ही गणेश कदम यांची असून, गणेशच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. तसेच पटकथा, संवाद सचिन दरेकर लिहिणार आहेत.
सुनील शेट्टीची मराठीत धमाकेदार एन्ट्री
By admin | Updated: May 12, 2016 01:51 IST