Join us  

सुनिल ग्रोव्हर दिसणार खिलजीच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 8:40 PM

कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील कानपुर वाले खुराणाज्‌ ह्या शोमधून छोट्‌या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

ठळक मुद्देसुनिल ग्रोव्हर बनला खिलजीरणवीरलासुद्धा आवडला सुनील ग्रोव्हर

कॉमेडियन सुनिल ग्रोव्हर लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील कानपुर वाले खुराणाज्‌ ह्या शोमधून छोट्‌या पडद्यावर कमबॅक करणार आहे. पहिल्याच भागामध्ये तो रणवीर सिंगच्या अल्लाउद्दिन खिलजीच्या रूपात दिसून येणार आहे. ह्या विडंबनामध्ये खुद्द सुपरस्टार रणवीर सिंगसुद्धा सामील होणार असून बिनते दिल ह्या गाण्याचे विडंबन सादर करतील आणि प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणार आहेत.

यावर सुनिल ग्रोव्हर म्हणाला, “खिलजीची भूमिका साकारताना थोडी मस्ती आणण्यामध्ये मी खूपच उत्साहात होतो. मला आनंद वाटतो की प्रेक्षकांना हा ॲक्ट आवडला. खुद्द रणवीरलासुद्धा तो ॲक्ट आवडला. त्याला अख्ख्या ॲक्टबद्दल माहिती नव्हती पण त्याने खिलाडूवृत्तीने ते घेतले आणि तो खूप हसला.”स्टार प्लसवरील कानपुर वाले खुराणाज्‌चा पहिला एपिसोड प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करेल. रणवीर सिंगसोबत त्याच्या सिम्बाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीही ह्या मंचावर दिसणार आहेत.स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये कुणाल खेमू कॉमेडी शोमॅन सुनिल ग्रोव्हरसोबत दिसून येईल आणि प्रेक्षकांचे निश्चितपणे तुफान मनोरंजन होईल. 'कानपुर वाले खुराणाज्‌' हा शो लवकरच स्टार प्लसवर दाखल होणार आहे. कुणालला छोट्या पडद्यावर कॉमेडी करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.कानपुर वाले खुराणाज्‌ दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :कानपुरवाले खुराणाज्रणवीर सिंगसुनील ग्रोव्हर