Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये स्टेजवरच अचानक रडू लागली सुनिधी चौहान, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:05 IST

लखनऊमध्ये झालेल्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान भावनिक झाली.

बॉलिवूडची 'रॉकस्टार' गायिका सुनिधी चौहान हिचा आवाज आणि तिची ऊर्जा नेहमीच चाहत्यांना थक्क करणारी असते. पण, नुकत्याच लखनऊमध्ये झालेल्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सुनिधी भावनिक पाहायला मिळाली. सुनिधी हिचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात लखनऊमधील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान सुनिधीला स्टेजवरच अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.

सुनिधी चौहान ७ मार्च रोजी तिच्या आय अ‍ॅम इंडिया टूर २०२५-२६ चा भाग म्हणून लखनऊमधील कूलब्रीझ रिसॉर्टमध्ये परफॉर्मन्स करत होती. या कॉन्सर्टमध्ये सुनिधीला घशाच्या त्रासामुळे गाताना प्रचंड त्रास होत होता. सादरीकरणात अडथळा येत असल्याचे लक्षात येताच सुनिधीला स्टेजवरच रडू कोसळले. चाहत्यांशी संवाद साधताना ती म्हणाली, "आज माझा आवाज खूप वाईट आहे. माझ्यासोबत असं कधीच घडलं नाही आणि हे खरंच खूप लाजिरवाणं आहे. मला तुम्हाला नेहमी माझं १००% द्यायचं असतं, पण आज ते शक्य होत नाहीये".

आपल्या आवडीच्या गायिकेला स्टेजवर रडताना पाहून प्रेक्षकही भावूक झाले. टाळ्यांच्या कडकडाटात चाहत्यांनी तिला प्रोत्साहन दिले. सुनिधीची प्रकृती ठीक नसतानाही तिने शो अर्धवट सोडला नाही.  "तुम्ही माझ्यासोबत आहात हे पाहून मला बळ मिळतेय" असे म्हणत तिने आपला परफॉर्मन्स पूर्ण केला.

टूरचा शेवटचा टप्पागेल्या वर्षी २४ डिसेंबर २०२५ रोजी सुनिधीच्या 'आय अ‍ॅम इंडिया टूर २०२५-२६'ची सुरुवात मुंबईतून झाली होती. त्यानंतर, गायिकेने दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद आणि चेन्नई सारख्या अनेक प्रमुख शहरांमध्ये तिच्या परफॉर्मन्सने चाहत्यांची मने जिंकली. कोलकातामध्ये अ‍ॅक्वाटिका ग्राउंडवर या दौऱ्याचा समारोप होणार आहे. १४ मार्च रोजी सुनिधी चौहान कोलकातामध्ये परफॉर्मन्स करणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunidhi Chauhan breaks down on stage during live concert.

Web Summary : During a Lucknow concert, Sunidhi Chauhan, battling throat issues, tearfully apologized for a subpar performance. Supported by fans, she completed the show, expressing gratitude for their encouragement, part of her 'I Am India Tour'.
टॅग्स :सुनिधी चौहान