Join us

सुमीत पुन्हा वळला रंगभूमीकडे...

By admin | Updated: November 17, 2016 06:01 IST

सध्या मराठी नाटकांची चलती असल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ एक मराठी नाटक रंगभूमीवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्या मराठी नाटकांची चलती असल्याचे दिसत आहे. एकापाठोपाठ एक मराठी नाटक रंगभूमीवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अनेक कलाकारदेखील रंगभूमीकडे आकर्षित झालेले दिसत आहे. आता हेच पाहा ना, स्वानंदी टिकेकर आणि सुमीत राघवन एकाच नाटकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. नीरज शिरवईकर आणि सुदीप मोडक दिग्दर्शित ‘एक शून्य तीन’ असे या नाटकाचे नाव असणार आहे. रहस्यमय आणि थरारक असे हे नाटक असणार आहे. यानाटकात अभिनेता सुमीत राघवन पत्रकार आणि रिसर्चरच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बडी दूरसे आये है’ या लोकप्रिय मालिकेत व्यग्र असलेला सुमीत ‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकानंतर पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळला आहे. तर आणि त्याला साथ देत आहे ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधली मीनल अर्थात स्वानंदी टिकेकर. या नाटकाविषयी लोकमत सीएनएक्सला स्वानंदी सांगते, ''या नाटकाची तालीम करताना खूप मजा आणि धमाल केली आहे.'' सुमीतसोबत काम करण्याचा अनुभवदेखील खूप भन्नाट होता. तो सीनिअर असल्यामुळे थोडी भिती वाटत होती. मात्र त्याने तसे जाणवूनदेखील दिले नसल्याचे स्वानंदीने सांगितले आहे.