Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानचा दिग्दर्शक अली अब्बास जाफरने केले लग्न, पाहा त्याच्या पत्नीचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 18:29 IST

अलीचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. 

ठळक मुद्देअलीने २०२१ च्या सुरुवातीलाच लग्न करत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याच्या पत्नीचे नाव अलिशिया असून त्याने तिच्यासोबतचे फोटो शेअर करत आयुष्यभरासाठी माझी... असे कॅप्शन दिले आहे.

अली अब्बास जाफरने सुलतान, गुंडे, टायगर जिंदा है, भारत यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचे नुकतेच लग्न झाले असून त्याने त्याच्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून ते या फोटोंवर भरभरून कमेंट्स करत आहेत. 

अलीने २०२१ च्या सुरुवातीलाच लग्न करत त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. त्याच्या पत्नीचे नाव अलिशिया असून त्याने तिच्यासोबतचे फोटो शेअर करत आयुष्यभरासाठी माझी... असे कॅप्शन दिले आहे. तुझ्याकडे पाहिल्यावर मी माझी दुःख, टेन्शन विसरून जातो असं देखील त्याने लिहिले आहे. सामान्यांसोबत सेलिब्रेटीदेखील या दोघांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत. अनन्या पांडे, अर्जुन कपूर, दिशा पटानी यांनी देखील अलीला कमेंटद्वारे त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

अलीने काल केवळ त्यांच्या दोघांचा हातात हात घेतलेला फोटो पोस्ट केला होता. यानंतर अलीची बायको कशी दिसते याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. अलीची खूपच जवळची मैत्रीण कतरिना कैफ आणि तिची बहीण इसाबेलने या पोस्टवर कमेंट करत अलीला शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच रणवीर सिंगने देखील त्याचे अभिनंदन केले होते. 

अलीने एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. त्याने दिग्दर्शित केलेला काली पीली काही महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात इशान खट्टर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. तसेच त्याच्या तांडव या वेसबिरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. यात सैफ अली खान, डिम्पल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका असून हा ट्रेलर लोकांना प्रचंड आवडत आहे. 

टॅग्स :अली अब्बास जाफर