ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - सलमान खान व अनुष्का शर्माच्या सुलतानने पहिल्या आठवड्यातल्या कमाईच्या बाबतीत बजरंगी भाईजानचा विक्रम मोडीत काढला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये सुलतानने 208 कोटी रुपयांची कमाई केल्याचे वृत्त टाइम्स ऑप इंडियानं दिलं आहे.
पहिल्या दिवशीची कमाई, विकेंडची कमाई अशा अनेक बाबतीत सुलतान नवनवीन विक्रम करत असून एकूण कमाईच्या बाबतीतही सुलतान पीकेचाही रेकॉर्ड मोडेल असा अंदाज खुद्द आमीर खाननेच वर्तवला आहे.
याआधी पहिल्या आठवड्यात सगळ्यात जास्त कमाईचा विक्रम 182 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या बजरंगीच्या नावावर होता, असं बॉक्सऑफिसइंडिया.कॉमनं म्हटलंय.