Join us

सल्लू-लूलियाच्या लग्नाला अम्मीचा होकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:44 IST

अम्मी सलमा खान हिच्या आग्रहाखातर बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान लग्न करणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. रोमानियन गर्लफे्रण्ड लूलिया वंतूर हिच्यासोबत सलमान लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा आहे

अम्मी सलमा खान हिच्या आग्रहाखातर बॉलीवूडचा ‘दबंग’ सलमान खान लग्न करणार असल्याची बातमी सध्या चर्चेत आहे. रोमानियन गर्लफे्रण्ड लूलिया वंतूर हिच्यासोबत सलमान लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा आहे. ही बातमी किती खरी नि किती खोटी, हे नेमके सांगता येणार नाही. पण बुधवारी रात्री सलमान, लूलिया व सलमा खान हे तिघेही मुंबई विमानतळावर एकत्र दिसल्याने सलमानच्या लग्नाच्या चर्चेला आणखीच जोर चढला. यापूर्वी जेव्हाकेव्हा सलमान व लूलिया एकत्र आले तेव्हा ते मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून स्वत:चा बचाव करताना दिसले. पण बुधवारी रात्री दोघेही कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल दिसले. सलमान व लूलिया वेगवेगळ्या कारमधून एअरपोर्टवरून बाहेर पडले. सलमान एकटा तर लूलिया सलमानची आई व बहिणीसोबत दुसऱ्या गाडीत बसली. यादरम्यान लूलियाने सलमानच्या आईचा हात हातात घेतला होता. काही दिवसांपूर्वी ‘सुलतान’च्या सेटवर सलमान व लूलिया एकत्र दिसले होते. या वेळी त्यांच्या साखरपुड्याची चर्चा रंगली होती.