Join us

अशी आहे ‘बजरंगी भाईजान’ची शाहिदा

By admin | Updated: July 22, 2015 02:04 IST

बजरंगी भाईजान या चित्रपटाची जान असलेली शाहिदा म्हणजे खऱ्या आयुष्यातील हर्षाली मल्होत्रा सध्या खूप चर्चेत आहे. दर्शकांचे मन मोहून टाकणारी ही

बजरंगी भाईजान या चित्रपटाची जान असलेली शाहिदा म्हणजे खऱ्या आयुष्यातील हर्षाली मल्होत्रा सध्या खूप चर्चेत आहे. दर्शकांचे मन मोहून टाकणारी ही चिमुकली नेमकी कुठली, तिचे वय काय, तिने अभिनयाचे धडे कुठे घेतले असे अनेक प्रश्न चाहते विचारत आहेत. त्यांच्यासाठी ही हर्षालीबद्दलची ही खास माहिती देत आहोत. सात वर्षीय हर्षाली दिल्लीची राहणारी आहे. हजार मुलींना मागे टाकून सलमानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नीचा रोल हर्षालीने मिळविला. भारतीय सिने इंडस्ट्रीतील या चिमुकल्या स्टारने अनेक टीव्ही कार्यक्रमात काम केले आहे. सोबतच पिअर्स, फेअर अ‍ॅण्ड लव्हलीसह अनेक अ‍ॅडमध्ये ती झळकली आहे. लाईफ ओके या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘लौट आवो त्रिशा’ या मालिकेत ती दिसली होती. हॉर्लिक्स, एचडीएफसी बँक व अपोलो टायर्सच्या जाहिरातींमध्येही हर्षालीने काम केले आहे.