Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंद निहलानींच्या सिनेमात सुबोध

By admin | Updated: July 9, 2016 02:32 IST

सुबोध भावेने आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांत त्याच्या उत्तम अभिनयाने वेगळ्या उंचीवर त्याच्या भूमिकांना नेऊन ठेवले आहे. मराठी, हिंदी, मल्ल्याळम् चित्रपटांत काम

सुबोध भावेने आजपर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांत त्याच्या उत्तम अभिनयाने वेगळ्या उंचीवर त्याच्या भूमिकांना नेऊन ठेवले आहे. मराठी, हिंदी, मल्ल्याळम् चित्रपटांत काम केल्यानंतर आता सुबोध बॉलीवूडमधील उत्तम दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्यासोबत काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता तुम्हाला वाटेल की सुबोध कोणता हिंदी चित्रपट करतोय का, तर तसे अजिबातच नाही. गोविंद निहलानी त्यांच्या पहिल्यामराठी चित्रपटात सुबोधला अभिनयाची सुवर्णसंधी देत आहेत. याबद्दल स्वत: सुबोधनेच सोशल मीडियावरसांगितले आहे. इट्स माय प्रिविलेज टू वर्क विथ हिमअशा स्वरूपाच्या भावना सुबोधने व्यक्त केल्या आहेत.आता या चित्रपटाचे नाव अन् बाकी गोष्टी काही दिवसांतच आपल्याला समजतील तोपर्यंत सुबोधला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना थोडी कळ सोसावी लागणार आहे.