Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एका लग्नाची’ हिंदीत गोष्ट

By admin | Updated: July 6, 2015 03:02 IST

लोकप्रिय झालेल्या मालिका दुसऱ्या भाषेत डब करण्याचा ‘फंडा’ नवा नाही. इंग्रजीमधील अनेक मालिका हिंदीत प्रसारित झाल्या.

लोकप्रिय झालेल्या मालिका दुसऱ्या भाषेत डब करण्याचा ‘फंडा’ नवा नाही. इंग्रजीमधील अनेक मालिका हिंदीत प्रसारित झाल्या. आता यात भर पडली ती मराठी ‘डेलिसोप’ मालिकांची. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेने टीआरपी शेवटपर्यंत चढाच ठेवला. उमेश व स्पृहा या जोडीला घराघरात पसंती मिळाली. त्यामुळे या मालिकेची दखल घेणे हिंदीलाही भाग पडले. हीच मालिका ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या नावाने डब करून प्रेक्षकवर्ग ‘कॅच’ करण्याची क्लृप्ती निर्मात्यांनी लढविली आहे. मराठीतील मालिका हिंदीत डब होण्याची ही पहिलीच वेळ आहे.