Join us

किस्सा पहिल्या ऑनस्क्रीन 'किस'चा, १९३३ साली या अभिनेत्रीनं दिला होता ४ मिनिटांचा किसिंग सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 14:36 IST

८४ वर्षांपूर्वी बॉलिवूडच्या चित्रपटात किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता.

खरं तर ‘किसिंग सीन’ हा शब्द जरी कानावर पडला तरी, बॉलिवूडचा किसर बॉय इमरान हाश्मी याची आठवण होते. मात्र बॉलिवूडमध्ये इमरान हाश्मी अगोदर अ‍ॅक्ट्रेस देविका राणी यांनी किस सीनला सुरुवात केली होती. ८४ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये चित्रपट कर्मामध्ये किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता.

देविका राणी यांनी  १९३३ साली 'कर्मा' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताच त्यांनी बोल्ड सीन दिले. त्यांच्या चार मिनिटांच्या किसिंग सीनने सर्वांना हैराण केले. कर्मा चित्रपटामध्ये अभिनेत्री देविका राणी व हिमांशु राय यांनी पहिला किसिंग सीन दिला होता. चार मिनिटांचा हा किसिंग सीन होता. पण, हा कोणत्या लव सीनचा भाग नव्हता. तर या सीनमध्ये अभिनेता बेशुद्ध होतो आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी ती त्याला किस करते. हिमांशू राय आणि देविका राणी हे खऱ्या आयुष्यात पती पत्नी होते. परंतु त्यावेळी रुपेरी पडद्यावर बोल्ड सीन चित्रीत करणं सोप्पे नव्हते.

या चित्रपटातील एक किसिंग सीन हा चार मिनिटांचा होता. त्यानंतर देविका यांनी ३५ वेळा किसिंग सीन दिले. हे सीन त्याकाळी सर्वात बोल्ड सीन म्हणून ओळखले गेले होते. विशेष म्हणजे देविका राणी आणि हिमांशू रॉय यांच्या या सीनची रसिकांमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. या सीनमुळे देविका राणी हिंदी चित्रपटसृष्टीत किसिंग सीन देणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. त्यांच्या आधी कधीच कोणत्याच अभिनेत्रीने रूपेरी पडद्यावर किसिंग सीन दिले नव्हते.त्यांच्या या सीननंतर चित्रपटांमध्ये किसिंग सीन देण्यास अभिनेत्री सहज तयार होऊ लागल्या. विशेष बाब म्हणजे तेव्हा त्यांना दादासाहेब फाळके आणि पद्मश्री पुरस्काराने गैरविण्यात आले होते. 

देविका यांनी १० वर्षांच्या करिअरमध्ये  तब्बल १५ चित्रपटात काम केले. त्यांनी नेहमी समाजाचे विचार बदलतील अशा चित्रपटात काम केले. 

टॅग्स :इमरान हाश्मी