Join us

माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ थांबवा - श्वेता नंदा

By admin | Updated: October 10, 2016 16:17 IST

श्वेता बच्चन नंदा यांनी एक जाहीर पत्र लिहून आपल्या मुलीच्या व्यक्तीगत ढवळाढवळ करणा-या प्रसारमाध्यमांना चांगलेच सुनावले आहे.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 10 - बॉलिवुडचे शेहनशहा अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा यांनी एक जाहीर पत्र लिहून आपल्या मुलीच्या व्यक्तीगत ढवळाढवळ करणा-या प्रसारमाध्यमांना चांगलेच सुनावले आहे.  श्वेता बच्चन यांची मुलगी नव्या नंदाला सध्या प्रसारमाध्यमांनी चांगलेच हैराण करुन सोडले आहे.
 
तुम्ही माझ्या मुलीला ओळखत नाही तर, काही वेबसाईटसवर 'नाव्या नंदा हॉट पिचर्स' अशा कॅप्शन्ससह फोटो टाकले जातात. ते नाव्याला ओळखत नसताना तिचे खासगी फोटो टाकण्याचा अधिकार कोणी दिला ?,ती सेलिब्रिटी नाही. ती फक्त काही प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित आहे. पण ते तिच्या हातात नाही असे श्वेता नंदा यांनी पत्रात म्हटले आहे. 
 
नव्या तरुण आहे. अन्य मुलींसारखे तिलाही चांगला पेहराव करायला, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला, पार्टी करायला, फोटो काढायला आवडतात असे श्वेता नंदाने पत्रात म्हटले आहे. पत्र संपवतान तिथे तुमची मुलगी असेल तर तुम्ही काय कराल ? असा सवाल केला आहे.