- Sameer Inamdar
बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान काही दिवसांपूर्वी वेगळ्या कारणांनी चर्चेत होता. कोर्टाच्या नव्हे! सलमान चक्क आपल्या ड्रायव्हरच्या मुलाच्या लग्नास अख्ख्या खान कुटुंबासह हजर राहिला. बीर्इंग ह्यूमन अशी बिरुदावली मिरविणारी स्वयंसेवी संस्था चालविणारा सलमान प्रत्यक्षात असाही ह्यूमन आहे, हे यानिमित्ताने समोर आले. सलमानच नव्हे तर अनेक बॉलिवूड कलाकारांचे ड्रायव्हर नेहमीच चर्चेत असतात. बऱ्याच वेळा सकारात्मक तर काही वेळा नकारात्मक गोष्टींबाबत. बॉलिवूडमधील कलाकार आपल्या ड्रायव्हरसोबत कसे राहतात, याबाबत ही माहिती....सलमान खानसलमान खानला अलीकडे वारंवार कोर्टात जावे लागते. त्यामुळे त्याला वारंवार प्रवासही करावा लागतो. सलमान आपल्या ड्रायव्हरला अधिक सांभाळतो. त्याच्याकडे असणाऱ्या अशोक सिंग या ड्रायव्हरच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. ड्रायव्हर म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणारा सलमान तो कसला? स्वत:सोबत त्याने इतरही सहकलाकार या लग्नासाठी नेले होते. सलमान खान आपल्या ड्रायव्हरला चांगले वेतनदेखील देतो. त्यामुळे साहजिकच भाईकडे असणाऱ्या ड्रायव्हरचा रुबाबच न्यारा...!अजय देवगणअजय देवगण यालाही गाड्यांचे वेड आहे. त्यामुळे आपल्या गाडीवर चांगले ड्रायव्हर असावेत असे त्याचे म्हणणे असते. आपल्या गाड्यांवरील ड्रायव्हरला चांगला पगार देण्याबाबत तो नेहमी सतर्क असतो. त्याला ड्रायव्हरविषयी आत्मियता आहे. ‘विजयपथ’ या चित्रपटात त्याने ड्रायव्हरच्या मुलाची भूमिका केली होती.शाहरुख खानसुपरस्टार शाहरुख खानच्या मते, त्याचा ड्रायव्हर हा त्याच्या आयुष्यातील खरा हिरो आहे. कित्येक तास काम करुन कोणतीही कुरकूर न करणे हे त्याच्यासाठी सर्वांत मोठे आहे. पगाराशिवाय तो ड्रायव्हरला काही देत नाही. तो केवळ सांगू शकतो. मी शाहरुख खानचा ड्रायव्हर आहे. अर्थात काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या ड्रायव्हरला बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी शाहरुख अडचणीत आला होता.अमिताभ बच्चनबिग बी अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात ड्रायव्हरचे खूप मोठे महत्त्व आहे. त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून नागेश हा ड्रायव्हर होता. त्याचे लग्न जया बच्चन यांच्या मोलकरणीसोबत अमिताभ आणि जया यांनी लावून दिले होते. काही वर्षांपूर्वी नागेश यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा राकेश हा अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या घरी काम करतो. मानवी भावना ही महत्त्वाची असल्याचे अमिताभ यांना वाटते. कॅटरिना कैफकॅटरिना कैफला आपल्या ड्रायव्हरबाबत सहानुभूती असली तरी तिचा अनुभव वाईट आला. रणबीर कपूरसोबत तिचे ब्रेकअप झाल्यानंतर नाराज असलेल्या कॅटरिनाने या सर्व बातम्या आपला ड्रायव्हर पुरवित असल्याचा आरोप तिने केला होता.प्रियांका चोप्राप्रियांका चोप्राला आजही त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्यांविषयी आणि ड्रायव्हरविषयी माहिती आहे. त्यांच्याकडे पांढरी मर्सिडीज होती. मकबूलभाई नावाचा ड्रायव्हर त्यांच्याकडे होता. आजही प्रियांका आपल्या ड्रायव्हरशी तितक्याच सौजन्याने वागते. ड्रायव्हरना चांगला पगार असावा असेही तिचे म्हणणे आहे.