Join us  

एका चित्रपटानं रातोरात पालटलं नशीब; 'या' अभिनेत्रीनं कतरिना, महेश अन् विजय सेतूपतीलाही सोडलं मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 2:14 PM

 सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला‘नॅशनल क्रश’ हा टॅगही दिला आहे. 

बॉलिवूड इंडस्ट्रीत येणं अनेक कलाकारांचं स्वप्न असतं. इथे आल्यानंतर स्टारडम अनुभवणं, ते जगणं प्रत्येक कलाकाराच्या जमतंच असं नाही. पण इंडस्ट्रीतील अशी एक अभिनेत्री आहे. जिला फक्त एका सिनेमातून तुफान यश मिळवता आलं. सिनेमा हिट झाला आणि ती रातोरात स्टार झाली आहे.  सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ हा टॅगही दिला आहे. 

 सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त याच अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री म्हणजे मेधा शंकर.  मेधा शंकरनं तिच्या लोकप्रियतेनं कतरिना कैफ, मृणाल ठाकूर, महेश बाबू, विजय सेतुपती यांनाही मागे टाकलं आहे. नुकतंच इंटरनेट मूव्ही डेटाबेस म्हणजेच IMDb ने लोकप्रिय सेलिब्रिटींची आठवड्याभराची यादी जाहीर केली आहे. त्यात ही अभिनेत्री पहिल्या स्थानी आहे.

'12th Fail' चित्रपटाच्या शानदार यशानंतर मेधा शंकरचे नशीब रातोरात उजळलं आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून मेधा शंकर इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. मेधा शंकरने '12th Fail'चित्रपटामधून एवढी लोकप्रियता मिळवली की तिचे इन्स्टाग्रामवर झपाट्याने फॉलोअर्स वाढले. मेधा रातोरात नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली.

 '12th Fail' हा 27 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर '12th Fail' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली.  ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. '12वी फेल' चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले. या चित्रपटात विक्रांत मेसी आणि मेधा शंकर यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. या सिनेमाची  आयपीएस मनोज शर्मा यांच्या संघर्षाची, जिद्दीची, प्रामाणिकपणाची, चिकाटीची, स्वाभिमानाची आणि अपार कष्टांची ही कथा आहे. या सिनेमाचं केवळ भारतातच नाही तर जगभरातून प्रेम आणि विशेष कौतुक होत आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाविक्रांत मेसीकतरिना कैफमृणाल ठाकूरमहेश बाबू