Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टारकिड तैमूर अली खानचा क्यूट व्हिडीओ व्हायरल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 12:14 IST

तैमुर दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्याचा किडी पूलमध्ये खेळतानाचा एक क्यूट व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर हा आता सर्वांचाच लाडका बनला आहे. सैफ आणि करिनापेक्षाही जास्त त्याचे फॅन्स आता झाले आहेत. सध्या तैमूरही प्रचंड ग्लॅमर अनुभवतो आहे. पाहता पाहता तैमूर दोन वर्षांचा झाला असून साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आपला वाढदिवस साजरा करतो आहे. तैमुरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला झाला.

तैमुर दोन वर्षाचा जरी झाला असला तरी त्याची लोकप्रियता बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. त्याचा किडी पूलमध्ये खेळतानाचा एक क्यूट व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तैमूर हा बीचवर त्याच्या खेळण्याच्या टबात छानपैकी मस्ती करताना दिसतोय. या व्हिडीओला प्रचंड लाईक्स मिळताना दिसत आहेत. तुम्हीही पाहा हा क्यूट व्हिडीओ...

तैमूर अली खान हा आता मीडिया फ्रेंडली झाला आहे. कुठेही पापाराझी त्याचे फोटो काढत असले की तो मस्त पोझेस देतो. तो त्याचे ग्लॅमर एन्जॉय करतो आहे. मध्यंतरी सैफ आणि करिना यांनी त्याला मीडिया आणि त्याच्या फॅन्सपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. 

टॅग्स :तैमुरकरिना कपूरसैफ अली खान द. आफ्रिका