Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्टारकिड अबरामने दिल्या नाताळच्या शुभेच्छा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:49 IST

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याचा मुलगा अबराम याने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.      

बॉलिवूडमध्ये आता स्टारकिड्सची सध्या चलती आहे. तैमूर अली खान, आर्यन, अबराम, इनाया हे स्टारकिड सध्या मीडिया फ्रेंडली होत असून त्यांचेही बरेच चाहते असल्याचे दिसून येत आहे. आता सध्या म्हणाल तर बॉलिवूडमध्ये नाताळचे सेलिब्रेशन आणि त्याची तयारीने जोर धरला आहे. हा सण उत्साहात सेलिब्रेट करण्यासाठी काहीतरी विशेष तयारीत व्यस्त असल्याचे दिसून येतेय. मग हे छोटे स्टारकिड्स कसे दूर राहतील? आता हेच बघा बॉलिवूडचा किंग खान शाहरूख याचा मुलगा अबराम याने चाहत्यांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.                  

 

या फोटोत त्याच्यासोबत शाहरुख दिसत असून त्याने त्याची नेहमीची आयकॉनिक पोझ दिली आहे. त्याच्यासारख्याच पोझमध्ये अबरामही दिसत आहे. चमचमत्या लाईटिंगमध्ये या दोघांनी हा खास फोटो काढला आहे. 'सितारे के ख्वाब देखने वालो हमने चांद को पैदा किया है', असे कॅप्शन त्याने या फोटोवर दिले आहे. चाहत्यांनी हा फोटोला भरभरून लाईक दिले आहे. गौरी खाननेही हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

अबराम हा असा स्टारकिड आहे जो सोशल मीडियावर आपल्याला प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असल्याचं दिसून येतं. तो त्याचे वेगवेगळे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. मध्यंतरी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता त्याचा हा नाताळच्या शुभेच्छा देणारा फोटो सगळीकडे धुमाकूळ घालतोय. 

टॅग्स :शाहरुख खानअबराम खाननाताळ