Join us

'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ता अन् सावनीची ऑफस्क्रीन धमाल; सोनू निगमच्या सुपरहिट गाण्यावर केला अप्रतिम डान्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 17:21 IST

'प्रेमाची गोष्ट' ही मालिकेची मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरु होती.

Swarda Thigle And Apurva Nemlekar Video: 'प्रेमाची गोष्ट' ही मालिकेची मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरु होती. सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत या मालिकेचं नाव सुद्धा सामील आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, सई, माधवी, पुरू, इंद्रा, जयंत कोळी आणि सावनी या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. दरम्यान, या मालिकेप्रमाणे त्यातील कलाकारदेखीस अनेकदा चर्चेत येतात. त्यांच्या अभिनयासह सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अशातच नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्री स्वरदा ठिगळे आणि अपूर्वा नेमळेकरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरल्याचा पाहायला मिळतोय.

दरम्यान, सोशल मीडियावर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि स्वरदा ठिगळेचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्या दोघीही भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.  सोनू निगमच्या सुपरहिट गाण्यावर त्यांना अप्रतिम डान्स केलाय. व्हिडीओमध्ये स्वरदा आणि अपूर्वाची केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांच्या डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. शिवाय चाहते व्हिडिओला पसंती देत आहेत. 

अपूर्वा आणि स्वरदाने दोघींनीही हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पेजवर शेअर केला आहे.  व्हिडिओमधील त्यांचे हावभाव लक्ष वेधून घेत आहे. अशातच या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी म्हटलंय, बेस्ट फ्रेंड तर आणखी एका यूजरने शेवंताबाई ऑन फायर अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया