Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्रा, महेश बाबू आणि राजमौलींचा 'वाराणसी' कधी प्रदर्शित होणार? मोठं अपडेट समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:32 IST

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू आणि दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी 'वाराणसी' चित्रपटाबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे.

 'बाहुबली' आणि 'आरआरआर' सारखे जागतिक स्तरावर गाजलेले चित्रपट देणारे दिग्दर्शक एसएस राजामौली सध्या त्यांच्या आगामी 'वाराणसी' या भव्य प्रोजेक्टवर काम करत आहेत. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांनी एक अत्यंत खास मुहूर्त शोधला आहे.

'वाराणसी' हा चित्रपट राम नवमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 'वाराणसी'  या चित्रपटात महेश बाबू भगवान रामाच्या अवताराशी प्रेरित असलेली भूमिका साकारताना दिसणार आहे. म्हणूनच चित्रपट निर्मात्यांना असं वाटतंय की, पुढच्या वर्षीची राम नवमी ही या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सर्वात योग्य तारीख असेल. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

'वाराणसी' चित्रपटाचा काही महत्त्वाचा भाग अयोध्येतील राम मंदिरात आणि आसपासच्या परिसरात चित्रित करण्याचा विचार राजामौली हे करत आहेत. यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. राजामौलींच्या चित्रपटात नेहमीच भव्यता असते, त्यामुळे अयोध्येतील चित्रीकरण हा चित्रपटाचा मुख्य आकर्षण बिंदू ठरू शकतो.

'वाराणसी' चित्रपटाचं दुसरं मोठं वैशिष्ट्य म्हणजे बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा. प्रियंका या चित्रपटाच्या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. महेश बाबू आणि प्रियंका चोप्रा ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. महेश बाबूचा हा पहिलाच 'पॅन इंडिया' चित्रपट असणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra, Mahesh Babu, and Rajamouli's 'Varanasi' Release Date?

Web Summary : Rajamouli's 'Varanasi,' starring Mahesh Babu and possibly Priyanka Chopra, may release on Ram Navami. Filming could occur in Ayodhya's Ram Mandir, adding grandeur. This marks Mahesh Babu's pan-India debut.
टॅग्स :एस.एस. राजमौलीप्रियंका चोप्रामहेश बाबू