Join us
Daily Top 2Weekly Top 5

Srivalli, Pushpa, Hardik Pandya: 'श्रीवल्ली'ची क्रेझ संपेना! आता हार्दिक पांड्या आजीलाच घेऊन नाचला, तुम्ही पाहिलात का त्यांचा व्हिडीओ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 16:09 IST

विशेष म्हणजे हार्दिकच्या आजीनेही त्याचासोबत झकासपैकी डान्स केला.

Srivalli, Pushpa, Hardik Pandya: "पुष्पा.. पुष्पराज... झुकेगा नहीं साला..." हा डायलॉग आतापर्यंत ऐकला नाही अशी व्यक्ती सापडणं खूपच कठीण आहे. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदना यांचा पुष्पा हा चित्रपट सिनेमागृहात आला आणि त्याने सारे रेकॉर्ड्स मोडले. दाक्षिणात्य सिनेमांचं हिंदी भाषांतर केलेले चित्रपट पाहणारा चाहता वर्ग मोठा आहे. पुष्पा चित्रपट रिलीज केला तेव्हाच तो हिंदीमध्येही रिलीज करण्यात आला. त्यामुळे या चित्रपटाने केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर देशभर आपला चाहता वर्ग मिळवला.

पुष्पा चित्रपटातील गाणीही तुफान हिट झाली. श्रीवल्ली आणि सामी सामी या दोन गाण्यांच्या डान्स स्टेप्स तर कानाकोपऱ्यात पोहोचल्या. श्रीवल्ली गाण्याच्या डान्स स्टेपवर अनेक सेलिब्रिटींनी डान्स केला. भारताचा अष्टपैलू खेळाडू यालाही हा मोह आवरला नाही. त्याने तर चक्क आपल्या आजीलाच या गाण्यावर ताल धरायला लावला. विशेष म्हणजे. हार्दिकच्या आजीनेही त्याचासोबत झकासपैकी डान्स केला. पाहा व्हिडीओ-

हार्दिकच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून भरपूर लाईक्स मिळाले. हार्दिकची पत्नी नताशा हिने या व्हिडीओ 'खूपच गोड (Cutest)', अशी कमेंट केली. तर हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या याने व्हिडीओवर दोन बदामाचे इमोजी कमेंटमध्ये लिहिले. इतकंच नव्हे तर पुष्पा चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुन यानेही या व्हिडीओवर कमेंट केली. 'आजींना माझा नमस्कार. हा डान्स मला खरंच खूप आवडला', असं अल्लू अर्जुनने लिहीले.

टॅग्स :पुष्पाहार्दिक पांड्याअल्लू अर्जुननताशा स्टँकोव्हिच