Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवीने केला धक्कादायक खुलासा!

By admin | Updated: May 17, 2017 04:36 IST

अभिनेत्री श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी एका सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये आली होती.

अभिनेत्री श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रीदेवी एका सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये आली होती. यावेळी श्रीदेवीने एक धक्कादायक खुलासा केला. तिने ‘माझ्या मुली जान्हवी आणि खुशी या दोघींना माझे अंगाईगीत गाणे अजिबात आवडत नव्हते. माझा आवाजच असा होता की, त्या माझ्या तोंडून कुठलेही गाणे ऐकायला त्या उत्सुक नसायच्या. जान्हवी व खुशी लहान होत्या तेव्हा, मी जेव्हा केव्हा त्यांना गोष्ट सांगायचे तेव्हा त्या मुळीच झोपायच्या नाहीत. पण मी अंगाईगीत गायला लागले की, त्या लगेच झोपी जात. कारण माझा आवाज त्या सहन करू शकायच्या नाहीत आणि मी गाणे थांबवावे म्हणून त्या अगदी लगेच झोपून जात,’ असे श्रीदेवी म्हणाली. ‘माझ्या दोन्ही मुली आधीपासूनच समजूतदार आहेत. मी त्यांच्यावर कधीही माझे विचार लादले नाहीत. किंबहुना त्यांच्यावर माझ्या विचारांची बळजबरी लादण्याची मला गरजच भासली नाही. मी आईपेक्षा त्या दोघींची चांगली मैत्रीण आहे. जान्हवी व खुशी या दोघींनाही जंक फूड अजिबात आवडत नाही. त्या दोघींनी कधी कधी जंक फूड खावे, असे अनेकदा मला वाटते,’ असेही ती म्हणाली. ‘कुठलीही महिला आपल्या आईशिवाय आणि आई बनल्याशिवाय अधुरी आहे,’ असेही ती म्हणाली.